
मन हे वेडे गुंतले,
श्वासही श्वासात अडकला,
असूनी तू मजपाशी,
का रे हा दुरावा!
का रे हा दुरावा!
ध्यानी मनी विचार एक,
होत आहेत सगळे भास,
असूनी आपुले ऐक्य,
का रे हा दुरावा!
का रे हा दुरावा!
शब्दांची नाही गरज,
कळते भावना दोघांस,
तरीही असा हा एकांत,
का रे हा दुरावा!
का रे हा दुरावा!
- बिल्वा पाटणकर